ग्रामपंचायत नवापूर

२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार नवापूर गावाची एकूण लोकसंख्या सुमारे ४,७७३ इतकी आहे. त्यापैकी २,४१४ पुरुष तर २,३५९ महिला आहेत. तसेच ० ते ६ वयोगटातील बालकांची संख्या सुमारे ५२६ इतकी आहे. गावात अंदाजे १,१९० पेक्षा जास्त कुटुंबे वास्तव्यास आहेत.

 

गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे. येथे प्रामुख्याने भात, भाजीपाला, नारळ, सुपारी तसेच इतर पिकांची लागवड केली जाते. काही लोक मजुरी, मासेमारी, लहान व्यवसाय कामधंदा करतात.

लोकजीवन

नवापूर गावातील लोकजीवन साधे, परंपरागत आणि निसर्गाशी जोडलेले आहे. गावातील बहुतांश लोक शेती, शेतमजुरी आणि लहान-मोठ्या व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करतात. भात, भाजीपाला, नारळ, सुपारी तसेच हंगामी पिकांची शेती येथे केली जाते. पावसाळ्यात शेतीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असते, तर उन्हाळ्यात लोक इतर कामधंदे किंवा मजुरी करतात.

गावात प्रामुख्याने आदिवासी (वारली, कातकरी इ.), कुणबी, आगरी आणि इतर समाज राहतात. प्रत्येक समाजाची स्वतःची परंपरा, सण-उत्सव आणि सांस्कृतिक वारसा आहे. आदिवासी समाजात पारंपरिक वारली चित्रकला, तारपा नृत्य आणि लोकगीत यांना विशेष महत्त्व आहे. सण-उत्सवाच्या वेळी गावातील लोक एकत्र येऊन आनंदाने नृत्य-गायन करतात.

लोकसंख्येची माहिती

 
क्रमांकक्षेत्रतपशील
एकूण लोकसंख्या
4,773
पुरुष लोकसंख्या
2,414
महिला लोकसंख्या

2,359

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालयहोयहोय
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)नाही 0  नाही 
उपकेंद्र (Sub Center)हो हो 
अंगणवाडीहो हो 
प्राथमिक शाळाहो हो 
माध्यमिक शाळाहोय होय  
उच्च माध्यमिक शाळानाही 0नाही 
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्रनाही 0नाही 
समुदाय भवन (Community Hall)नाही नाही 
१०स्वस्त दर दुकान (PDS)नाही नाही 
११श्मशानभूमी / स्मशानभूमीहो हो 
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरहो हो 
१३सीएससी केंद्र (CSC Center)हो हो 

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव: ग्रामपंचायत नवापूर 

बँकेचे नाव : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

शाखेचे नाव: नवापूर 

अकाउंट नंबर : 00710030000450 

आई एफ एस सी कोड :TDCB0000071

पत्ता : मु.पो. नवापूर, ता. पालघर, जि. पालघर, ४०१ ५०१